इत्यादी या शब्दात कोणते दोन शब्द आहेत.

This question was previously asked in
Maharashtra Zilla Parishad Junior Assistant Clerk (Nagpur) 2015 Official Paper
View all Maharashtra Zilla Parishad Junior Assistant Clerk Papers >
  1. इत्य + अदी
  2. इत्य + आदी
  3. इति + अदि
  4. इति + आदी

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : इति + आदी
Free
Maharashtra Zilla Parishad: ST 1: Logical Reasoning I (तार्किक तर्क I)
20 Qs. 40 Marks 25 Mins

Detailed Solution

Download Solution PDF

उत्तर - इत्यादी या शब्दात इति + आदी हे दोन शब्द आहेत.

इत्यादी हे यणादेश स्वरसंधीचे उदाहरण आहे.

इत्यादी = इति + आदी = इ + आ = य् + आ = या

यणादेश स्वरसंधी - इ, उ, ऋ (ह्रस्व किंवा दीर्घ) यांच्या पुढे विजातीय स्वर आल्यास इ/ई बद्दल य्, उ/ऊ बद्दल व् तर ऋ बद्दल र् वर्ण येतात आणि त्यात पुढील स्वर मिसळून संधी तयार होते. अशाप्रकारे य्, व्, र् असे बदल होतात त्याला यणादेश असे म्हणतात.

Important Pointsसंधी - जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोन्हीबद्दल एक वर्ण तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकाराला संधी असे म्हणतात.

संधीचे तीन प्रकार आहेत.

  1. स्वरसंधी
  2. व्यंजनसंधी
  3. विसर्गसंधी

स्वरसंधी - एकमेकांच्या शेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर त्यांना स्वरसंधी असे म्हणतात.

स्वर + स्वर असे याचे स्वरूप असते.​ उदा. विद्या + अर्थी = विद्यार्थी  (आ + अ = आ)

व्यंजनसंधी - जवळ जवळ येणाऱ्या या दोन वर्णांपैकी दोन्ही वर्ण व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल तर त्याला व्यंजनसंधी असे म्हणतात.

व्यंजन + व्यंजन किंवा स्वर असे त्याचे स्वरूप असते.  उदा. सत् + आचार = सदाचार (त् + आ)

विसर्गसंधी - एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर तेव्हा त्यास विसर्ग संधी असे म्हणतात. 

विसर्ग + व्यंजन किंवा विसर्ग + स्वर असे त्याचे स्वरूप असते. उदा. नि: + अंतर = निरंतर

More संधी Questions

Hot Links: teen patti gold old version teen patti master downloadable content teen patti dhani teen patti bodhi master teen patti