Question
Download Solution PDFव्यंजनसंधीने तयार झालेल्या शब्दांचा गट ओळखा.
(अ) ग्रामोद्योग, कलोपासक, वनौषधी
(ब) निस्तेज, बहिष्कार, भास्कर
(क) चंद्रोदय, लंबोदर, गंगोदक
(ड) सुषमा, अनुष्ठान, उद्धरण
Answer (Detailed Solution Below)
Detailed Solution
Download Solution PDFव्यंजनसंधी- जवळ जवळ येणाऱ्या या दोन वर्णांपैकी दोन्ही वर्ण व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल तर त्याला व्यंजनसंधी असे म्हणतात.
- सु + समा = सुषमा
- अनु + स्थान = अनुष्ठान
- उत् + हरण = उद्धरण
वरील संधी मध्ये जवळ जवळ येणाऱ्या या दोन वर्णांपैकी दोन्ही वर्ण व्यंजने किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असल्यामुळे ही व्यंजनसंधीची उदाहरणे आहेत.
सुषमा, अनुष्ठान, उद्धरण ही व्यंजन संधीची उदाहरणे आहेत.
Additional Informationसंधी - जोडशब्द तयार करतांना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोन्हीबद्दल एक वर्ण तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकाराला संधी असे म्हणतात.
स्वरसंधी - एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर त्यांना स्वरसंधी असे म्हणतात किंवा एक पाठोपाठ एक येणारे दोन स्वर एकत्र होण्याच्या क्रियेला स्वरसंधी असे म्हणतात.
ग्रामोद्योग, कलोपासक, वनौषधी, चंद्रोदय, लंबोदर, गंगोदक हे गुणादेश स्वरसंधीचे उदाहरण आहे.
ग्राम + उद्योग = ग्रामोद्योग
कला + उपासक = कलोपासक
वन + औषधी = वनौषधी
चंद्र + उदय = चंद्रोदय
लम्ब + उदर = लम्बोदर
गंगा + उदक = गंगोदक
अ /आ + इ / ई = ए, अ /आ + उ / ऊ = ओ, अ /आ + ऋ = अर याप्रमाणे दोन वर्ण एकत्र येऊन ए, ओ, अर असे बदल झाल्यास त्याला गुणादेश म्हणतात.
विसर्गसंधी - एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर तेव्हा त्यास विसर्ग संधी असे म्हणतात.
विसर्ग + व्यंजन किंवा विसर्ग + स्वर असे त्याचे स्वरूप असते.
निस्तेज, बहिष्कार, भास्कर ही विसर्गसंधीची उदाहरणे आहेत.
निः + तेज = निस्तेज
बहिः + कार = बहिष्कार
भा: + कर = भास्कर
Last updated on Jun 19, 2025
-> The MPSC Group B Mains Exam Date 2025 which will be conducted on 29th June 2025.
-> The MPSC Group B Prelims 2025 took place on 2nd February 2025.
-> The MPSC Group B result 2025 has been released on the official website @mpsc.gov.in.
-> MPSC Group B notification was released by the Maharashtra Public Service Commission has released a total of 480 Vacancies for various posts under various departments of Government of Maharashtra.
-> Previously, Interested candidates had applied from 14th October 2024 to 4th November 2024.
-> Candidates can check the MPSC Group B Previous Year Papers which helps to check the difficulty level of the exam.