Question
Download Solution PDFआनंद, दुःख, आश्चर्य, प्रशंसा, तिरस्कार अशा मनातील विविध भावना व्यक्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दानंतर कोणते विरामचिन्ह येते ?
Answer (Detailed Solution Below)
Detailed Solution
Download Solution PDFउद्गारवाचक चिन्ह [ ! ] - वाक्यामध्ये असलेली एखाद्या मनुष्याच्या मनातील कोणतीही भावना व त्या भावनेची तीव्रता स्पष्ट दर्शवण्याकरिता उद्गारवाचक चिन्ह [ ! ] वापरण्यात येते. हे विराम चिन्ह त्या भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी देतात. उदा. - अरेरे ! तो नापास झाला.
आनंद, दुःख, आश्चर्य, प्रशंसा, तिरस्कार अशा मनातील विविध भावना व्यक्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दानंतर उद्गारचिन्ह (!) येते.
Important Pointsविरामचिन्हे - आपण जेव्हा बोलतो, संभाषण करतो तेव्हा आपल्याला मधूनमधून थांबावे लागते. या थांबण्याला विराम असे म्हणतात. बोलण्यातील विराम निरनिराळ्या चिन्हांनी दाखवले जातात अशा चिन्हांना विरामचिन्हे म्हणतात. विरामचिन्हांमुळे वाक्य कोठे संपले, कोठे सुरु झाले की अपूर्ण आहे अशा विविध गोष्टी कळतात.
विरामचिन्हे दोन प्रकारची आहेत.
1. विराम दर्शवणारी - पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम इ.
2. अर्थबोध करणारी - प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह
Additional Informationपूर्णविराम [ . ] - वाचताना किवां बोलताना एखादे वाक्य पूर्ण झाले, ह्या अर्थाने आपण जेथे क्षणभर थांबतो तेथे पूर्णविराम [.] चा उपयोग होतो. कोणतेही वाक्य अथवा परिच्छेद पूर्ण झाले आहे, हे दर्शवणाऱ्या विराम चिन्हाला पूर्णविराम असे म्हणतात. उदा. - तो घरी आला.
पूर्णविराम हा एखाद्या नावाचे संक्षिप्त रूप दर्शवण्यासाठी सुद्धा वापरतात. उदा. - वि. दा. सावरकर = विनायक दामोदर सावरकर.
स्वल्पविराम [ , ] - ज्या वाक्यात अथवा शब्दात अल्प विश्रांति घेतली जाते पण वाक्य पूर्ण झालेले नसते, अशा वाक्यात स्वल्पविराम हया विराम चिन्हाचा उपयोग होतो. नाम, सर्वनाम, क्रियापदे इ. समान जातीचे शब्द एका मागे एक आल्यास, त्या शब्दांच्या मध्ये स्वल्पविरामचा वापर करण्यात येतो, तसेच एकाच प्रकारचे एका पेक्षा अधिक वाक्य क्रमाने आल्यास किंवा एखाद्या नावाचे संबोधन प्रकट करण्यासाठी स्वल्पविरामचा उपयोग केला जातो. उदा. - मला कथा, नाटके, कादंबरी आवडतात.
प्रश्नचिन्ह [ ? ] - लिखाणात जेव्हा एखादा प्रश्न विचारलेला असतो, तेव्हा त्या प्रश्नाच्या शेवटी [?] प्रश्नचिन्ह वापरतात. हया विराम चिन्हाचा उपयोग प्रत्येक प्रश्नाच्या शेवटी केला जातो. उदा. - तू केव्हा येणार आहेस?
Last updated on Jun 19, 2025
-> The MPSC Group B Mains Exam Date 2025 which will be conducted on 29th June 2025.
-> The MPSC Group B Prelims 2025 took place on 2nd February 2025.
-> The MPSC Group B result 2025 has been released on the official website @mpsc.gov.in.
-> MPSC Group B notification was released by the Maharashtra Public Service Commission has released a total of 480 Vacancies for various posts under various departments of Government of Maharashtra.
-> Previously, Interested candidates had applied from 14th October 2024 to 4th November 2024.
-> Candidates can check the MPSC Group B Previous Year Papers which helps to check the difficulty level of the exam.